top of page
IMG_20191220_113454.jpg

कार्य दिशा 

स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण च्या विविध कार्य दिशांची ओळख इथे आपण करू घेणार आहोत.  

​

ज्ञानप्रबोधनेच्या स्थापनेपासूनच स्त्रीशक्ती प्रबोधनासाठीच्या कामाचा समावेश होता . मुलींची प्रशाला हे सुरुवातीच्या काळातील मोठे काम .शहरी तसेच ग्रामीण भागात स्त्री शक्तीने स्त्रीशक्तीसाठी गेलेल्या कामाचा अंतर्भाव होता .यातच स्त्रीशक्ती प्रबोधन ग्रामीणचा समावेश झाला . गेली तीस वर्षे हे काम अविरत चालू आहे . शिवगंगा , गुंजवणी , वेळवंडी नदीच्या खोऱ्यातील १५० गावे वाडी वस्त्यांमध्ये ग्रामीण महिलांच्या जीवनसाखळीतील सर्व वयोगटांसाठी हे काम चालते .त्यातही आर्थिक सामाजिक दृष्ट्या पाठीमागे राहिलेल्या गटांसाठी काम करण्याचे धोरण राहिले आहे .सर्व वयोगटातील "तिच्याशी " संबंधित महत्त्वाच्या बहुतांश विषयावर काम चालते .

 

यामध्ये बाल ,कुमार , किशोरी , युवती ,हिरकणी , प्रौढा ,ज्येष्ठ सदस्य असे सर्व वयोगटासाठी काम चालते . ज्यामध्ये व्यक्तिमत्व विकास , क्षमता संवर्धन , वृत्ती घडण, प्रेरणा जागरण ,आणि कर्ती  सामाजिक जाणीव असा भर दिला आहे . यासाठी आर्थिक स्वावलंबन , आरोग्य , समूह गुण विकसन ,नेतृत्व , वंचित विकास ,विस्तार , कार्यकर्ती क्षमता विकास अशा उपक्रमांची रचना केलेली आहे .

​

कार्य दिशा 


१. आर्थिक स्वावलंबन 

बचत गट 
स्वयंरोजगार 
खेळते भांडवल 
आर्थिक साक्षरता 

​

२. आरोग्य 

जाणीव जागृती 
तपासणी 

​

३. समूह गुण विकसन (वृत्ती घडण)

किशोरी 
युवती 
नवचैतन्य दल 
कार्यकर्ता क्षमता विकास 
अंतरकेंद्रीय साहचर्य 
संघटन 

​

४. नेतृत्व 

​

५. वंचित विकास 

सहनिवास 
बालवाडी 
एकल 
कातकरी विकास 

​

६. विस्तार  

हिरकणी 
अन्य विषय 

 

bottom of page